Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोनाला हरविण्यासाठी आत्मशक्ती मजबूत करणे आवश्यक

najarkaid live by najarkaid live
June 18, 2020
in आरोग्य, जळगाव
0
कोरोनाला हरविण्यासाठी आत्मशक्ती मजबूत करणे आवश्यक
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) -कोरोनाला घाबरू नका पण जागरूक रहा. आपल्याला शासनाच्या आरोग्य विभागाकडून चांगले उपचार व सेवा नक्कीच मिळत असते. कोरोना झाल्यानंतर रूग्णालयात मिळालेले चांगले उपचार व सेवेमुळेच आम्ही आमच्या परिवारात सुखरूप परतु शकलो. अशा प्रातिनिधीक भावना कोरोनातून पूर्णपणे बरे होऊन घरी परतलेल्या रावेर शहरातील जिजाऊ नगर येथील तेजस किशोर पाटील यांनी व्यक्त केल्या.कुठलेही भीती बाळगू नये असे अवाहन देखील आज त्यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे जिल्हा वासियांना केले आहे.

रावेर येथील भाडेकरू असलेल्या परिवारातील 3 व घरमालक यांच्या परिवारातील ४असे सातही जण कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचारानंतर कोरोना मुक्त झालेल्या जिजाऊ नगरातील तेजस किशोर पाटील यांनी एक व्हिडीओ संदेशाद्वारे प्रतिक्रिया देत यंत्रणेचे आभार मानले असून या सातही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

जळगाव शहरात राहणा-या 28 वर्षाच्या महिलेस 11 मे, 2020 रोजी कोरोनाची लक्षणे जाणवताच त्यांची तपासणी केली गेली आणि 14 मे, 2020 रोजी त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह येताच शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना झाल्याची प्रथम भीती वाटली पण तेथे रूग्णालयातील डॉक्टर, पारिचारिका यांनी दिलेला विश्वास, दाखवलेली ममता आणि वाढविलेले मनोबल यामुळे आपण बरे होऊन घरी लवकर परत जाऊ हा आपल्याला विश्वास वाटू लागल्याचे त्या सांगतात. हा विश्वास सार्थ ठरत 21 मे रोजी पूर्णपणे बरे होऊन घरी परतले. घरच्यांच्या चेह-यावरचा आनंद हा मला मिळालेल्या उपचाराने मिळवून दिला असे त्या सांगतात. कोरोना विषाणूचा संसर्ग झाला तरी आवश्यक ती खबरदारी घेतल्याने तो बरा होऊ शकतो. त्याचा उगाच बाऊ करण्याचे कारण नाही. आपल्याला शासकीय रूग्णालयात उत्तम सेवा मिळत असते यावर विश्वास ठेवा, असा सल्लाही त्या आता कोरोनाग्रस्तांना देतात.

जळगावच्या एकाच परिवारातील दोन महिलांना कोरोनाची लागण झाली. दोघींचाही 10 मे रोजी तपासणी अहवाल पॉझिटीव्ह येताच येथील शासकीय कोविड रूग्णालयात दाखल केले गेले. डॉक्टरांकडून नियमित उपचार व वेळेवर औषधे मिळत होती . रूग्णालयात चांगल्या दर्जाचा चहा, नाश्ता, जेवण मिळाल्याने औषधांचा सकारात्मक परिणाम लवकर झाल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले. आमच्यावर चांगला इलाज झाल्याने आम्ही आमच्या कुटुंबात सुखरूप परतल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

अमळनेरच्या 56 वर्षांच्या पुरूषाने देखील हीच भावना व्यक्त केली. कोरोनाची लक्षणे दिसू लागताच त्यांना जळगावला दाखल केले. 10 मे रोजी रिपोर्ट पाॅझिटिव्ह येताच कोविड रूग्णालयात दाखल केले गेले. मनात काहीशी भिती होती. पण तेथे मिळणारा उपचार मला धीर देणारा ठरला. डॉक्टर आणि परिचारिकांचे सहकार्याने चांगले उपचार झाल्याने 20 मे रोजी घरी परतू शकलो .शासकीय रूग्णालयात देखील चांगला उपचार होतात असे मी आवर्जून सांगतो असे ते विश्वासाने सांगतात.

पाचो-याच्या 21 वर्षाच्या युवकाची देखील ही अशीच प्रतिक्रिया.. आपल्याला लक्षणे जाणवू लागताच
पाचो-याच्या ग्रामीण रूग्णालयात गेलो. त्यांनी तातडीने जळगावला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतीगृहात 8 मे रोजी क्वारंटाईन केले. 9 मे रोजी पॉझिटीव्ह रिपोर्ट येताच जळगावच्या कोविड रूग्णालयात हलविले. पॉझिटीव्ह रिपोर्ट येताच भीतीचे वातावरण पसरते. रूग्ण परतणार नाही अशी भावना सर्वसाधारणपणे जनमानसातून व्यक्त होते. मात्र मी अजिबात डगमगलो नाही. रूग्णालयातील उपचार करणा-या सर्व स्टाफने बरे होण्याचा आत्मविश्वास दिला. त्यामुळे माझे मनोबल वाढले. रूग्णालयातील डॉक्टर करीत असलेल्या ट्रिटमेंटवर पूर्ण विश्वास ठेवला. आणि मी सुध्दा इलाजादरम्यान सकारात्मक राहिलो. त्यामुळे जीवनदान मिळून मी पूर्ण बरा होऊन 21 मे रोजी घरी परतलो. आपल्याला लक्षणे जाणवताच तात्काळ रूग्णालयात जाऊन तपासणी करून घ्या. जागरूक राहून वेळेवर उपचार घेतल्याने कोरोनाचा संसर्ग बरा होतो असे सचीन सांगतो.

जळगावच्या वाघनगरात
राहणा-या एकाच कुटुंबातील तेरा जणांना कोरानाची लागण झाली. घरात एका व्यक्तीला कोरोना झाला मात्र तो लवकर लक्षात आला नाही. त्यामुळे त्यांना गमवावे लागल्याचे दु:ख त्यांच्या कुटुंबातील 23 वर्षाचा युवक व्यक्त करतो. आम्हाला लक्षणे दिसताच आम्ही रूग्णालयात दाखल झालो. वेळेवर आम्हाला चांगले उपचार मिळाले आणि आम्ही घरी परतलो. आज घरातील सगळयांची प्रकृती ठणठणीत असल्याचे हा युवक आनंदाने सांगतो. शिवाय कोरोनाला घाबरू नका, लक्षणे जाणवताच नजीकच्या रूग्णालयात जाऊन तपासणी करून घ्या. विनाकारण बाहेर फिरू नका. मास्क व सॅनिटायझरचा वापर करा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा आणि आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घ्या. असे आवाहनही त्यांने सर्व नागरिकांना केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अभिनव बहुउद्देशीय संस्थेची कोरोना बाबत जनजागृती

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी १३५ कोरोना बाधित रुग्ण आढळले

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Next Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी १३५ कोरोना बाधित रुग्ण आढळले

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us