जळगाव,(प्रतिनिधी)- आताच मला आदेश प्राप्त झाले असून मी सकाळीच येथून निघेल व उद्या दि.१८ रोजी सायंकाळ पर्यंत जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारणार असल्याचे नूतन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ‘दैनिक नजरकैद’ शी बोलतांना सांगितले.
डॉ.अविनाश ढाकणे यांची शासनाने तडकाफडकी बदली केल्याने त्यांच्या जागी नूतन जिल्हाधिकारी म्हणून सांगली जिल्हा परिषदेचे सीईओ अभिजित राऊत यांची शासनाने नियुक्ती केली आहे.