चाळीसगाव( किशोर शेवरे)भडगाव तालुक्यातील महींदळे येथील अन्यायग्रस्त बौद्ध बांधवांची भेट घेवून या प्रकरणाची सविस्तर माहिती घेवून या विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे यांची चाळीसगाव येथील कार्यालयात आज समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक धर्मभुषण बागुल यांनी भेट घेतली .या भेटीत महिंदळे प्रकरणात बौद्धांवर कसा अन्याय झाला यावर सविस्तर चर्चा करण्यात आली व
१)50 पेक्षा जास्त लोक या हल्यात सामील असतांनाही फक्त चार लोक का आरोपी करण्यात आले .?
२) बौद्ध लोकांना जखमा असताना , मार लागलेला असताना व त्यांची जबाब देण्याची मनस्थिती नसताना त्यांचा जबाब नोंदवून घेण्याची घाई का करण्यात आली .?
3)घटना घडली त्याच वेळी गावातील वीज पुरवठा कसा बंद होता ?
४)बौद्ध समाजाचे 7 लोक जखमी असताना ,त्यांचेवर हल्ला करून त्यांनाच 307 कलम लावून आरोपी करण्यात आले ? हे कसे ?
अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली .
*मागणी*
1] या घटनेतील आरोपीवर 307 कलम लावण्यात यावे .
2]फिर्यादी चा व इतर जखमींचा पुरवणी जबाब घेण्यात यावा .
3]निरपेक्ष पणे चौकशी करून योग्य न्याय देण्यात यावा .
….अशी मागणी समता सैनिक दला मार्फत करण्यात आली .
यावेळी लॉक डाऊन चे नियम पाळून फक्त तीन पदाधिकारी यांनी कार्यालयात निवेदन दिले त्याप्रसंगी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक धर्मभूषण बागुल, जिल्हा सचिव भाईदास गोलाईत,चाळीसगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील जाधव,चाळीसगाव तालुका संघटक विशाल पगारे,आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,