नवी दिल्ली ;- लोकसभा निवडणुकीत ५४२ पैकी काँग्रेसला केवळ ५२ जागा मिळाल्या आहेत. राहुल गांधी यांनी वायनाडमधून दणदणीत विजय मिळवला असला तरीही परंपरागत अमेठी मतदारसंघ त्यांना राखता आला नाही. तर १९ राज्यांमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. पक्षाध्यक्ष या नात्याने राहुल यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा सादर केला नसल्याचे काँग्रेस प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.
या वेळी लोकसभा निवडणुकीत १९ राज्यांमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये काँग्रेसच्या पक्षसंघटनेची वाताहत झालेली आहे. सहा महिन्यांपूर्वी छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची सरकारे स्थापन झाली असली तरी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पक्षाला काठावर बहुमत मिळालेले आहे. उत्तर प्रदेशच्या २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला पराभव पत्करावा लागला होता. पक्षाध्यक्ष या नात्याने राहुल यांचे नेतृत्व सतते अपयशी ठरत असल्याने पक्षासमोर संघटनात्मक पेच निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याचे समजते. राहुल गांधी यांनी बैठकीत राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला. पण कार्यकारिणीने त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले.