नेरी ता. जामनेर,(प्रतिनिधी)- येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या 21 व्या वर्धापन दिना निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केक कापून व श्री माऊली होमिओपॅथी &रिसर्च सेंटर,रिंगरोड जळगाव (खान्देश) च्या वतीने कोरोना व्हायरस सारख्या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी व प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथीक मेडिसिन सोशल डिस्टन्स पाळून मोफत वाटप करण्यात आले या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मा.जिल्हाउपाध्यक्ष किशोर खोडपे यांनी मनोगत व्यक्त केले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी 10 जून 1999 रोजी पक्षाची स्थापना केली त्याच आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. पक्षाची ध्येय धोरणे व मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी प्रत्येकाने 80% समाजकारण व 20% राजकारण या धोरणाप्रमाणे प्रत्येकाने काम करीत राहिले पाहिजे.
श्री माऊली होमिओपॅथी हॉस्पिटल च्या वतीने वाटण्यात आलेल्या रोगप्रतिकारक शक्ती या कोरोना आजाराला प्रतिबंध करू शकते व होमिओपॅथी कशा प्रकारे सर्व श्रेष्ठ पॅथी आहे हे विविध दाखले देऊन सांगितले.तसेच कार्यकर्त्यांपैकी चेतन वाघ व हर्षल गुजर यांचा वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रवादी युवक चे विवेक कुमावत,गणेश पाटील,शुभम मोगरे,राहुल राजपूत,पवन वाघ, नूतन कोळी,दानिश पिंजारी,रुपेश डिवरे,नेरी पॉईंट बेकरी चे संचालक अनिकेत खोडपे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.