जळगाव,(प्रतिनिधी) – रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांनाही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार असून त्या करिता तहसीलदार दाखला मात्र घ्यावा लागणार आहे.
कोविड १९ रुग्णांना अंगीकृत खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी आर्थिक बोजा पडू नये तसेच कोविड १९ महामारीच्या संकटात आरोग्यविषयक हमी व नागरिकांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी मर्यादित कालावधीसाठी व्याप्ती वाढविण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत दि.३१जुलै २०२० पर्यंत शुभ्र शिधापत्रिका धारक कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे.
रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांनी तहसीलदार यांच्या कडून दाखला घ्यावा किंवा अधिवास दाखला सादर केल्यास त्या सोबत एक घोषणा पत्र सादर केल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येणार आहे.