मुंबई – राज्यात २०१४ पासून सेना भाजपचे सरकार आहे तरीही शिवसेनेला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयश आले आहे अस विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. तसेच शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी मोर्चा काढण्याची भाषा करत आहे ही फक्त नौटंकी आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.
वडेट्टीवार यांनी ‘राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री गप्प बसतात आणि बाहेर येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढण्याची भाषा करतात. हा प्रकार म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरची शिवसेनेची नौटंकी आहे. तसेच सत्ताधारी पक्षाने जनतेचे प्रश्न मार्गी लावायचे असतात.वडेट्टीवार यांनी ‘राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री गप्प बसतात आणि बाहेर येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढण्याची भाषा करतात. हा प्रकार म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरची शिवसेनेची नौटंकी आहे. तसेच सत्ताधारी पक्षाने जनतेचे प्रश्न मार्गी लावायचे असतात.
संबंधित यंत्रणेला आदेश देऊन त्याची अंमलबजावणी करून घ्यायची असते मात्र शिवसेनेचे सरकारमध्ये काहीही चालत नाही अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
दरम्यान, पुढे बोलताना ‘सत्ताधारी असूनही विरोधी पक्षासारखे शिवसेनेला आंदोलने करण्याची भाषा करावी लागते. शिवसेनेचा पीक कंपन्यांच्या विरोधातील मोर्चा म्हणजे पुतणा मावशीचे प्रेम आहे, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.