जळगाव दि. 2 -केसीई सोसायटी संचलित आय एम आर मध्ये फक्त प्राध्यापकांचा विचार न करता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी आणि त्यांचे कार्यालयीन कामकाज सुरळीत होण्यासाठी केसीई सोसायटी संचालित आय एम आर च्या वतीने वेबिनार च्या माध्यमातून कार्यशाळेचे आयोजन केले आहे. दि. 2 आणि 3 जून या दोन दिवसीय कार्यशाळेत 250 कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. या कार्यशाळेत एम एस वर्ड ,एक्सेल ,सोशल मीडिया सिक्युरिटी या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे .ऑनलाइन प्रात्यक्षिकातून संस्थेचे प्राध्यापक प्रा.एस एन खान, प्रा.रूपाली नारखेडे आणि प्रा. अमोल पांडे हे मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती आय क्यु ए सी काॅर्डिनेटर प्रा.तनुजा फेगडे यांनी कळवले आहे .या कार्यक्रमाची सुरुवात आय एम आर च्या संचालिका प्राध्यापिका शिल्पा बेंडाळे आपल्या मार्गदर्शनपर भाषणातुन करणार आहेत या कार्यक्रमाचे संयोजन प्राध्यापिका चारुता खडके व प्रा. रूपाली नारखेडे या करीत आहेत.