भडगांव (प्रतिनिधी) : माऊली फाउंडेशन व यशस्विनी सामाजिक अभियान प्रमुख नगरसेविका योजना पाटील महिला व युवती यांना मास्क वापरण्याचा असा आग्रह करीत आहेत. कोरोना संसर्गापासून दूर रहा.आर्सेनिक अल्बम 30 होमियोपेथी गोळ्या घ्या.काळजी घ्या सुरक्षित रहा असा संदेश फिजिकल डिटेन्ट ठेऊन घरोघरी जाऊन करीत आहेत.
तसेच ड्यूटी वरील कार्यरत कोरोना योद्धा रक्षकांना सुरक्षा मास्क व अर्सेनिक् गोळ्या वाटप करीत आहेत. सदर जनजागृती साठी माउली फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक यांचे सहकार्य मार्गदर्शन लाभत आहे.कोरोनाशी यशस्वी लढा देउया,काळजी घ्या.प्रशासनास सहकार्य करा.यशस्वी लढा देऊन कोरोनाला नाहीसा करुया असे आवाहन नगरसेविका योजना पाटील करीत आहेत.