भडगाव, (प्रतिनिधी)- येथील प्रतिक पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त आज सॅनिटायझर वाटप करण्यात आले या वेळी सोशल डिस्टन्सचे पालन करत कोरोना बाबत जनजागृती करण्यात आले.
लॉकडाऊनच्या काळात कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी, सफाई कर्मचारी यांस सॅनिटायझर वाटप केले. सार्वजनिक सेवेत कार्यरत असलेली त्या प्रत्येक व्यक्तीस सॅनिटायझर देणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन आज पोलिस स्टेशन भडगाव, शनी चौक येथे गस्तीवर असलेले पोलिस बांधव, लाडकुबाई शाळेस नवीन दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, श्री राम मंगल कार्यालय कॉरंटाईन सेंटर येथील कर्मचारी तसेच सफाई कर्मचारी तसेच यांस अमोल पाटील, ऋषीकेश पाटील, भुषण निकम यांच्या मदतीने सॅनिटायझर वाटप करण्यात आले.