जामनेर, (प्रतिनिधी) – तालुक्यात आज चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे अवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
जामनेर शहरातील महावीर रोडवरील एका 57 वर्षीय रुग्णाचा ४ दिवसा पूर्वी मृत्यू झाला होता . त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून जामनेर शहरातील भीमनगर भागातील ५० वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.तर गारखेडा येथील एका खाजगी फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या एक 36 वर्षीय यूवक कोरोना बाधीत आढळला आहे. तर नाचणखेडा येथील एक 35 वर्षीय युवकाचा रिपोर्ट ही पॉझिटीव्ह प्राप्त झाला असून एकाच दिवशी ३ रुग्ण कोरोना बाधीत आढळल्याने तालूक्याची चिंता वाढली आहे.
तालूक्यात बाधीतांची संख्या १२ झाली असून त्यात ग्रामिण भागातील ७ रुग्ण असून त्यातील पळासखेडा येथील एक रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. शहरात आजपर्यंत ५ रुग्ण आढळले आहेत . तर दोन जणांचे मयता नंतर रिपोर्ट पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत.
जामनेर येथील रुग्ण पॉझिटीव्ह आलेल्या परिसराला प्रशासनाने सील केलेला आहे.