जामनेर,(प्रतिनिधी)- जामनेर शहरातील पहूर रस्त्यावर असलेल्या वनविभागाच्या कार्यालयाला चक्क नामफलकचं लावण्याचा विसर पडला असून या कार्यालयाप्रति कार्यालय प्रमुख असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील यांची असलेली उदासीनता दिसून आली आहे.
https://youtu.be/YfQHawcUxEg
जामनेर वनविभागाच्या तालुका स्तरीय कार्यालयाला नामफलक लावलेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.नामफलक नसलेले एकमेव जामनेर वनविभागाचे कार्यालय असल्याचे समोर आल्याने याठिकाणी सेवेत असलेले अधिकरी या कार्यालयाप्रति किती उदासीन आहेत याबाबत लक्षात येते.
नागरिकांची कार्यालय शोधण्यासाठी शोधाशोध
जामनेर वनविभागाच्या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची कार्यालय शोधाशोध करण्यासाठी चांगलीच फरपट होत असते.या कार्यालयाला साधा नामफलकही लावू नये का असा साधा प्रश्न सामान्यांना पडला आहे.तरी आजही जामनेर वनविभागाचे कार्यालय नामफलकाच्या प्रतीक्षेत आहेच.
वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सर्व नियम धाब्यावर ठेवत आपला कारभार सुरु ठेवला आहे.वरिष्ठ कार्यालयाने याप्रकारची दखल घेऊन संबंधीत अधिकारी यांना याबाबत खुलासा मागवून शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर जामनेर येथील वनविभागाच्या कार्यालयाला तात्काळ नामफलक लावावा अशी मागणी होत आहे.