चाळीसगाव (प्रतिनिधी)- येथील नगरपालिका हद्दीतील नागद रोड वरील व आठवडे बाजार परिसरात तंबाखूचे ३ कारखाने आहेत या तिघा कारखान्यातून सुमारे पाचशे ते सहाशे कामगार आहेत या कारखान्याला लागूनच हुडको कॉलनी मधील तहजीब हायस्कूल जवळ राहणाऱ्या एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे या परिसरातील सर्व रस्ते वस्ती सील करून हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून प्रशासनाने २७ रोजी घोषित केला आहे.
प्राताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांना दि २९ रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की या तीनही तंबाखू कारखान्याच्या परिसरात झोपडपट्टी वस्ती आहे या हुडको परिसरातील बहुतांशी कामगार या कारखान्यात कामकाज करतात या कारखान्याच्या कामगारांना मास पुरवले गेले नाही शिवाय कारखान्याचे सॅनिटाझर व कामगारांच्या शरीराचे दररोज तापमान तपासण्यासाठी पूरक मशीन देण्याचे बंधनकारक असताना कारखान्याने ते पुरवले नाही तसेच स्वच्छता नाही या सर्व कारणांमुळे कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे कोरोना चा प्रादुर्भाव झाल्यास या परिसरातील सर्व रहिवासी जनतेला बाधा होऊ शकतो त्यामुळे नागद रोड वरील ३ तंबाखूचे कारखाने किमान पंधरा ते वीस दिवस बंद ठेवावेत तेव्हा एक-दोन दिवस बंद ठेवून चालणार नाही हे वस्तुस्थिती असतानाही सदरील तंबाखूचे कारखाने सुरू राहिल्यास त्यामुळे परीसरातील कामगारांना कोरोना चा प्रादुर्भाव झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील कारखाने बंद न केल्यास आपल्या कार्यालयासमोर रयत सेना तीव्र आदोलन करणार असल्याचा ईशारा देण्यात आला आहे.माहिती व उचित कार्यवाहीसाठी प्रत मुख्यमंत्री म रा मुंबई ,पालकमंत्री जळगाव ,जिल्हाधिकारी जळगाव, पोलीस अधीक्षक जळगाव ,तहसीलदार चाळीसगाव, शहर पोलीस निरीक्षक चाळीसगाव यांना देण्यात आल्या आहेत निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार , शहर उपाध्यक्ष प्रदीप मराठे ,शहर कार्याध्यक्ष सुनील निंबाळकर ,बाबासाहेब पगार, रवींद्र जाधव,मिलिंद लोखंडे ,फारुक शेख, शाम वाघमोडे , राहुल सोनवणे भाऊसाहेब सोनवणे, रोबखान पठाण, अमोल कोळी , मुकुंद पवार ,भरत नवले , दिपक देशमुख,सागर चव्हाण,छोटु अहिरे , अदिच्या सह्या आहेत.