अमळनेर – कोरोना विषाणूच्या दहशतीने जगातील जनजीवन विस्कळीत झाले असून त्यात हजारो लोकांचे बळी जाऊनही कोरोनाचे थैमान थांबलेले नाही त्याच प्रकारे वेदनेने ओतप्रोत भरलेल्या विविध कहाण्यांना जन्म ही दिला आहे.
अमळनेर तालुक्यातील शिरूड गावात घडलेली अशीच एक हृदयद्रावक कहाणी शुक्रवार दि. 22 मे वैशाख अमावस्येच्या सकाळी शिरूड गावाच्या वेशीत एक वृद्ध गृहस्थाने प्रवेश केला.
लॉकडाउन चा काळ आणि कोरोंना ची धास्ती असताना प्रारंभी शिरूडकरांनी या अनाहूत पाहुण्याकडे अगोदर साशंकतेने आणी नंतर मात्र अतिथी देवो भव या संस्कारामुळे या वृद्धाची आस्थेने चौकशी केली तेव्हा समजले की हरचंद गईंदल बैसाणे हा 70-72 वर्षाचा वृद्ध धुळे शहरातून पायी चालत शिरूड येथे आला होता कधी काळी हा शिरूड येथे राहत होता शिरूड सोडून तो धुळ्याला गेला तेथेच त्याचा मुलासह रहिवास होता मात्र आता कोरोना काळात अचानक शिरूड ची आठवन का आली हे कळले नाही परंतु तो पायी चालत शिरूड पर्यंत आला खरा ग्रामस्थांनी त्याला कॉरंटाइन करून स्वीकारले त्यास गावातील जी.प प्राथमिक शाळेत मुक्कामास ठेवले सरपंच सुपडू पाटील पोलीस पाटील विश्वास महाजन व ग्रामस्थ यांनी शाळेतच त्याची जेवणाची व्यवस्था केली धुळ्याहुन आलेला हा वृद्ध शिरूडच्या शाळेत स्थिरावला मात्र दोन दिवस मुक्कामी असतांना दि. 25 मे सोमवार रोजी त्याचा अचानक शाळेतच मृत्यु झाला. त्यामुळे शिरूडकर प्रचंड धास्तावले हा कोरोनाचा बळी तर नव्हे ना? ही भय व शंका प्रत्येकाच्या मनात होती आता या मृत देहाचे करायचे काय? यावर चर्चा झाली सरपंच,पोलीस पाटील, तलाठी,व जबाबदार मंडळीनी प्रारंभी तहसीलदार यांना फोन करून घटना सांगितली तहसीलदार यांनी या संदर्भात जानवे प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करण्याचा सल्ला देऊन आपल्या जबाबदारी तुन निसटण्याचा प्रयत्न केला त्वरित P.A.C शी संपर्क केला असता तेथील प्रमुख डॉ रनाळकर यांनी आमच्याकडे स्टाँफ उपलब्ध नसल्याने काही करू शकत नाही असे सांगून हात वर केले आता करावे काय? असा मोठा प्रश्न शिरूडकरांसमोर उपस्थित झाला होता. वृध्दाच्या मुलाचा नंबर मिळवून त्याच्याशी संपर्क करून वडिलांच्या मृत्यु ची बातमी कळविली परंतु मुलानेही प्रथम मृतदेह ताब्यात घेण्यास आढेवेढे घेतले मला कसे येता येईल ते पाहतो असे कोरडे उत्तर मुलाने दिल्यावर समस्या अधिकच गंभीर झाली आणखी एक प्रयत्न करून पाहावा म्हणून अमळनेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांना फोन करून घटनेची माहिती दिली असता त्यांनी सपशेल माघार घेऊन आता काही करता येणे शक्य नाही तुमच्या गावात मृत्यू झाला आहे बाहेर गावची मंडळी तेथे येऊन अंत्यसंस्कार करेल काय ? तुम्हीचं काय ते उरकून टाका असे कोरडे मार्गदर्शन केले आणि समस्या शिरूडकरांवर सोपवली चौहबाजूने असहकार्यचे वातावरण असतांना शिरूड चे जागृत नागरिक व mseb चे इंजिनिअर प्रफुल्ल पाटील प्रांत मॅडम सीमा अहिरे यांच्याशी बोलून त्यांच्याकडुन काही सहकार्य मिळते काय म्हणून अखेरचा प्रयत्न करून पाहिला व त्यांना सांगितले की आम्हांस फक्त मृतदेह प्लस्टिक किट मधे पँक करून द्या अंत्यसंस्कार आम्ही करून घेऊ प्रांत मॅडम यांनी मी चौकशी करून तुम्हास कळविते परंतु अर्धा तास वाट पाहूनहि त्यांच्या शी संपर्क न होऊ शकल्याने शेवटी शिरूड चे पत्रकार शरद कुलकर्णी यांनी थेट जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांच्याशी संपर्क केला त्यांना सविस्तर माहिती दिली जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने सर्व ऐकून घेऊन संमधितांना त्वरित सूचना दिल्यावर मात्र संपूर्ण शासकीय यंत्रणा खळबळून जागी झाली नंतर जानवे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ रानाळकर यांनी दोन कर्मचारी शिरूड ला पाठविले त्यांनी वृद्धाचा मृतदेह प्लास्टिक किट मधे गुंडाळून दिला व ते निघून गेले रात्री 11 वाजता या वृद्धाचा मुलगा धुळ्याहुन आला व शिरूड ग्रामस्थांनी मध्यरात्री अंत्यसंस्कार केला. शिरूड च्या ग्रामस्थांनी माणुसकीचे एक उत्तम उदाहरण दिले मात्र सरकारी पातळीवर सर्वत्र दिसलेल्या माणुसकीशून्य व अहंकारी वृत्तीचा निषेध नोंदवीला आहे या प्रसंगी माजी पंचायत समिती सभापती शाम अहिरे विकाससो चे चेअरमन प्रा. सुभाष पाटील पत्रकार मिलिंद पाटील सरपंच सुपडू पाटील पोलीस पाटील विश्वास महाजन वीज अभियंता प्रफुल्ल पाटील तलाठी प्रवीण सोनवने आर पी आय चे यशवंत बैसाने निवृत्त पो. नि महादू बैसाणे मुंबई शिवसेनेचे रवींद्र बैसाणे पत्रकार रजनीकांत पाटील व गावातील आरोग्य सेविका अनिता खंडेराव पाटील आरोग्य सेवक विशाल सांगीले कोतवाल दत्तात्रय बोरसे हरिष पाटील नरेंद्र राजाराम पाटील ग्रा.पं शिपाई सतीश पाटील भैय्या साहेबराव पाटील नाना आनंदा पवार अंकित पाटील आदी यांनी सहकार्य केले.