चाळीसगाव (प्रतिनिधी) – अपार्टमेंट च्या कामावर मुतारीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला बॅनर भाजपाचे नगरसेवक राजेंद्र चौधरी याने लावून महाराजांची विटंबना करून समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या चा प्रकार शहरातील लक्ष्मी नगर येथे झाला होता याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक देखील झाली होती मात्र त्याचे पक्षातून निलंबन होऊन त्याचे नगरसेवक पद रद्द व्हावे अशी मागणी शहर अध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांच्याकडे शिवप्रेमी संघटनांकडून होऊन देखील २० दिवस उलटूनही त्याचे निलंबन झाले नाही अथवा त्याची पक्षातून हकालपट्टी झाली नाही लवकरच त्याची पक्षातून हकालपट्टी होऊन त्याचे नगरसेवक पद रद्द करावे ही मागणी पुर्ण व्हावी म्हणून भाजपा शहर अध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांचे घरासमोर शिवप्रेमी संघटनांकडून दि 29 रोजी रात्री 1 वाजता झोपमोड आंदोलन करण्यात आले.
शिवप्रेमी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी रात्रीच्या सुमारास झोपमोड आंदोलन करून भाजप शहर अध्यक्ष घुष्णेश्वर पाटील यांना नगरसेवक राजेंद्र चौधरी यांना भाजपा पक्षातून अद्याप पर्यंत पक्षातून निलबित का केले नाही असा जाब विचारण्यात आल्याने शहर अध्यक्ष घुष्णेश्वर पाटील यांनी शिवप्रेमी संघटनाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले की तुमच्या भावना पक्षश्रेष्टींच्या समोर मांडून राजेंद्र चौधरी यांचे पक्षातील सदस्य पद रद्द करण्याची आपली मागणी चा निर्णय लवकरात लवकर आपणांस कळविणार असल्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात येवून ७ दिवसांच्या आत त्यांचे निलबण झाले नाही तर पुढील आंदोलन यापेक्षा आक्रमक पध्दतीने होईल असा ईशाराच शिवप्रेमी संघटने दिला आहे यावेळी गणेश पवार, बाळु गायकवाड ,दिनकर पाटील, मुकुंद पवार, भरत नवले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.