जामनेर, (बाळू वाघ)- भुसावळ रोड वरील असलेल्या एका बियरबार वर छुप्या मार्गाने मद्य विक्री सुरु असल्याचे काही व्हिडीओ हाती आले आहेत.लॉक डाऊन काळात देखील हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरु असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या बियरबार मध्ये छुप्या पद्धतीने ग्राहकांना दारू विक्री केली जात आहे. आज रात्री देखील याची खात्री करण्यात आली. बार मध्ये असलेल्या एकास बार मधून मद्य विक्री सुरु असल्या बाबत विचारणा केल्यावर तो म्हणाला की मालकाने सांगितलं आहे म्हणून विक्री करतोय.गेल्या अनेक दिवसापासून लॉक डाऊन काळातही या बियरबार छुप्या पद्धतीने मद्य विक्री करत असल्याचे समजते. या बियरबार ची चौकशी करून कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.