उदगीर, (राहुल शिवणे)- महावितरण कंपनीने उदगीर जळकोट तालुक्यातील औद्योगिक वसाहती, शेती साठी लागणारी वीज पुरवठा अखंडित स्वरूपात करावा. या क्षेत्राला वांरवार वीजपुरवठा खंडित होणे योग्य नाही यामुळे या क्षेत्राचे मोठे अर्थिक नुकसान होते या बाबत योग्य काळजी घ्यावी अशा सुचना राज्याचे पर्यावरण पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या आहेत.
महावितरणबाबत माननीय राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली, या बैठकीला उपजिल्हाधिकारीप्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार उदगीर व्यंकटेश मुंडे, तहसीलदार जळकोट संदीप कुलकर्णी, न.प.मुख्याधिकारी उदगीर भरत राठोड, गटविकास अधिकारी उदगीर अंकुश चव्हाण, गटविकास अधिकारी जळकोट चंद्रहार ढोकणे, बसवराज पाटील नागराळकर (प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस), राजेश्वरजी निटुरे (माजी नगराध्यक्ष उदगीर), प्रा. शिवाजीराव मुळे (ता.अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस उदगीर), मन्मथ अप्पा किडे (ता.अध्यक्ष कॉंग्रेस जळकोट), अर्जुन मामा आगलावे (ता. अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस जळकोट), सिध्देश्वरजी पाटील (सभापती कृ.उ.बा.स.उदगीर), शिवाजी अण्णा केंद्रे, कल्याणजी पाटील (ता.अध्यक्ष कॉंग्रेस उदगीर),चंदन पाटील नागराळकर (युवक जि.अ.राष्ट्रवादी काँग्रेस लातुर), बाबुराव जाधव, बालाजी ताकबीडे(सभापती पं.स.जळकोट), संतोष तिडके(जि.प.गटनेते), बापुराव राठोड,समीर शेख,संगमेश्वर टाले,ज्ञानेश्वर पाटील, किरण पवार,यांच्यासह उद्योजक चंद्रकांत पाटील,रमेश अंबरखाने, सुदर्शन मुंडे,कोटलवार,बेद्रे सावकार,अमोल पाटील,कल्पेश बाहेती,महेश पाटील,वसंतराव पाटील,यांच्यासह शेतकरी व्यंकटराव पाटील,बापुराव भुरे, रऊफ थोडगे,उळागडे,भांगे,नागरगोजे या सोबत विद्युत वितरण कंपनी लातुर मुख्य अभियंता आर.आर.कांबळे, विद्युत वितरण कंपनी लातुर अधिक्षक अभियंता नंदीश माने, श्री.जाधव कार्यकारी अभियंता इत्यादी उपस्थित होते.
यावेळी महावितरण बाबत विविध विषयांवर चर्चा झाली यात प्रामुख्याने वीज वितरण कंपनी याच्या अधिकारी आणि सामान्य नागरिक याच्यात समन्वय असावा, शहरातील विविध भागात सर्वे करावे, वीज पुरवठा बाबत काही तक्रारी असतील तर त्या ताबडतोब निकाली काढण्यात यावेत, उदगीर व जळकोट तालुक्यात आवश्यक असणारे वीज टांँन्सफारमर ,केबल, इतर साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे.नागरिकाच्या अडचणी बाबत कनिष्ट अभियंता याच्या अघ्यक्षतेखाली समिती स्थापन करण्या बाबत योग्य तो निर्णय घ्यावा, स्थानिक पदधिकारी याच्या सोबत अधिकारी यांनी समन्वय साधावा. शहरातील नगरपालिका व महावितरण कंपनीच्या अधिकारी यांनी वीज पुरवठा बाबत आढावा घ्यावा. अशा सुचना राज्याचे पाणी पुरवठा राज्य मंत्री बनसोडे यांनी केल्या आहेत.