जामनेर, (प्रतिनिधी ) – तालुक्यातील जी .एम. फाऊंडेशनच्या वतीने व एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने माजी मंत्री तथा आ . गिरीष महाजन यांचे हस्ते मतदारसंघातील सुमारे २००अपंगांना ३चाकी मोटारसायकलचे वाटप करण्यात आले.
https://youtu.be/8FIIPufS1UI
अपंगांना त्यांचा छोटा मोठा व्यवसायही या वाहनावरून करता येणार आहे .एका वाहनाची किंमत ७५ते ८० हजार रु . असून अपंग बांधवांनी दिलेले वाहन न विकता या संधीचा लाभ घेऊन प्रगती साधावी . असे आवाहन आ . महाजन यांनी यावेळी केले .कोरोनाची अडचण दुर झाल्यावर ज्या अपंग भगिनी आहे त्यांनाही आपण ३चाकी जूपीटर मोटरसायकल देणार आहोत . त्याचबरोबर अजून काही दिव्यांग बांधवांना वाहन मिळाली नसतील त्यांनाही अशाच प्रकारचे वाहन दिले जाईल असेही आ . महाजन यावेळी म्हणाले .
यावेळी शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील , भाजपा तालूका अध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर ,न. पा. गटनेते डॉ . प्रशांत भोंडे , माजी प .स. सभापती छगन झाल्टे , नगरसेवक महेन्द्र बाविस्कर , आतिष झाल्टे ,दिपक तायडे , संतोष बारी , तेजस पाटील , जीतू नेमाडे , सदाशिव माळी आदी कार्यकर्ते ऊपस्थित होते .