जळगाव,(प्रतिनिधी)- जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना या रोगाने जगणे नकोसे केले आहे. त्यात नूतन मराठा महाविद्यालयातील NCC विभागातील विद्यार्थी सुमित सोनवणे नाद्रा ता. पाचोरा येथील विद्यार्थ्यांने सॅनिटाईझर वाटप करून कोरोना बद्दल जनजागृती केली.
तसेच शिरसोली येथील RSS व ग्रामपंचायत यांच्या निधीतून सागर खलसे( RDC दिल्ली ) व ज्ञानेश्वर आस्वार यांनी आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्या वाटून आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवू शकतो याबद्दल लोकांना घरोघरी जाऊन पटवून दिले.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.पी.देशमूख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले
तसेच कॅप्टन कमल बी. पाटील व लेफ्ट.शिवराज बी. मानके यांचे मार्गदर्शन लाभले.