जळगाव.दि.23 भारतीय कपास निगम लिमीटेड व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघ मर्यादित यांनी 24 एप्रिल 2020 पासून राज्यातील कापूस खरेदीस प्रारंभ केलेला आहे. लॉकडाऊनमुळे अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांकडील कापूस विकणे बाकी आहे.22मे रोजी जिल्हृयातील 48 हजार 391 कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्याकडील कापूस विकीसाठी कृषि उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केलेली आहे. प्रत्यक्षात 4 हजार 893 शेतकऱ्यांकडीलच कापसाची खरेदी केली गेलेली असून अद्यापही 43 हजार 498 नोंदणीकृत कापूस उत्पादक शेतकऱ्यांडील कापूस अद्यापही विक्री बाकी होणे बाकी आहे.
राज्यातील कापूस खरेदीच्या बाजारमुल्यापेक्षा शासनाने हमीदर हे जास्त असल्याने जिल्ह्यातील काही व्यापारी हे शेतकऱ्यांच्या माध्यमातून कापूस विक्री करण्याची शक्यता असल्याने जिल्ह्याबाहेरील व्यापारी व शेतकरी सुध्दा जिल्ह्यात बेकायदेशिररित्या प्रवेश करून जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रांवर कापूस विक्री करीता येणाची शक्यता लक्षात घेता राज्याच्या व जिल्ह्याच्या समावर्ती भागात तपास यंत्रणेद्वारे नियंत्रण ठेवणे आवश्यक असून अशा ठिकाणच्या चेकपोस्टच्या ठिकाणी पोलीस पथकांद्वारे अधिक दक्षता घेण्यात यावी तसेच भारतीय कपास निगम लिमीटेड व राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघानेही जिल्ह्यातील प्रत्यक्ष कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडीलच कापूस खरेदी केला जाईल याची दक्षता घ्यावी. कापूस खरेदी करतांना संबंधित शेतकऱ्यांकडील 7/12 उताऱ्यावर प्रत्यक्षात कापूर पिकाखाली एकूण किती क्षेत्र आहे? याची खात्री करावी.
तरी नोंदणीकृत सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडील सर्व कापूस लवकरात लवकर कसा खरेदी करता येईल याचे नियोजन संबंधितांनी तात्काळ करावे तसेच कृषि उत्पन्न बाजार समित्यांनी त्यांचेकडील नोंदणीकृत शेतकऱ्यांची कापूस खरेदी प्रथम येईल त्यास प्रथम प्राध्यान्य या तत्वानुसार करावी, खरेदी प्रक्रीयेत शेतकऱ्यांकडून यंत्रणेविषयी तक्रारी येणार नाहीत यासाठी सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधकांनी विशेष उपाययोजना कराव्यात असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी ,जळगाव डॉ.अविनाश ढाकणे यांनी एका आदेशान्वये कळविले आहे