जळगाव –गेल्या वर्षभरात पियुष नरेंद्र पाटील याच्याकडून नूतन मराठा महाविद्यालय आवारात झालेल्या गुन्हेगारी घटनांमुळे व अत्याचारासंदर्भात तसेच परीक्षा कालावधीत त्याच्या मार्फत चालविण्यात आलेले “कॉपी रॅकेट” त्याच बरोबर महाविद्यालय आवारात हत्यार घेऊन फिरतांनाचे व्हिडिओ, छायाचित्र, तसेच काही ऑडिओ विद्यार्थी पत्रकार परिषद घेऊन मीडियासमोर आणणार असल्याची कुणकुण पियुष पाटील यांना लागल्याने कारवाईच्या भीतीने बिथरले आहेत. विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषद घेऊ नये, तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनीवर दबाव टाकण्याच्या उद्देशानेच पियुष पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन बिनबुडाचे खोटेनाटे बेछूट आरोप केले आहे.असा खुलासा नूतन मराठा महाविद्यालय कर्मचारी संघटनेचे पुण्यप्रताप पाटील यांनी प्रसिद्ध पत्रकान्वय केला आहे.
नुतन मराठातील आवाराशी संबंध नसलेल्या “त्या” गाव गुंडांच्या विरोधात नूतन मराठा कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी मोहीम उघडली आहे. या मोहिमेस सर्व घटकातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेमुळे नूतन मराठा महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींचा मोठा आत्मविश्वास वाढला आहे.त्या गाव गुंडांचा बंदोबस्त झाल्याशिवाय कर्मचाऱ्यांची ही मोहीम लोकशाही मार्गाने सुरूच राहणार असल्याचे पुण्यप्रताप पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे..