भुसावळ,(प्रतिनिधी) – भुसावळ शहरात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना बाधीतांच्या संख्येनंतर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी रविवारी दि.17 रोजी भुसावळ शहराला भेट देत कंटेन्मेन्ट झोनमध्ये करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी करून प्रांताधिकारी कार्यालयात महत्त्वाची आढावा बैठक घेतली.
या बैठकीत भुसावळ शहरातील परीस्थितीचा आढावा जाणून घेतला. याशिवाय जिल्हाधिकार्यांनी डेटिकेटेड कोव्हिड सेंटर म्हणून घोषित केलेल्या रेल्वे रुग्णालयाला भेट देऊन रेल्वेचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्याशीही सविस्तर चर्चा केली. तसेच
जिल्हाधिकार्यांनी ट्रामा केअर सेंटरला मॅटर्निटी सेंटर म्हणून वापरण्यास सुरुवात करण्याच्या सूचना केलेल्या असून कंन्टेमेंट झोनचा परीसर हा एक किमीचा असल्याने या परीसरातील नागरीकांची होणारी गैरसोय पाहता या परीसरातील अंतर कमी करण्यात येऊन या सर्वच कंटेन्मेन्ट झोनमधून कोणीही व्यक्ती बाहेर जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना ही यावेळी देण्यात आल्या.तसेच यापुढे कोरोना संशयीत अत्यावस्थ रुग्ण आढळून आल्यास त्याला तात्काळ जळगाव कोव्हिड रूग्णालयात पाठवावे, अन्यथा स्थानिक स्तरावर सुरू करण्यात आलेल्या भुसावळच्या रेल्वे डेटिकेटेड कोव्हिड रूग्णालयात दाखल कयण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. भुसावळसह मुक्ताईनगर, यावल, रावेर, बोदवड, फैजपूर,सावदा आदी भागातील हायरिस्क रुग्णांना येथे हलवण्यात येणार आहेत.तसेच भुसावळ नगरपरिषदेला वैद्यकीय खर्चाची समस्या उद्भवल्याने चौदाव्या वित्त आयोगातून वैद्यकीय संसाधनांसाठी खर्च करण्याच्या परवानगीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. तसेच रेल्वेच्या डेटिकेटेड कोव्हिड रुग्णालयात उत्तम प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने या दवाखान्यात डॉक्टर,नर्सेस, औषधी,वार्डबाॕय,पीपीई किट्स सह इतर वैद्यकीय सेवा व संसाधनांचा तात्काळ पुरवठा करावा अशा सूचना जिल्हाधिकार्यांनी यावेळी दिलेल्या आहेत.भुसावळकर स्वयंस्फूर्तीने पाळत असलेल्या ४ दिवसीय जनता कर्फ्युचे जिल्हाधिकार्यांनी कौतुक करत आणखी कोरोनाबाधीतांची संख्या न वाढण्यासाठी शहरवासीयांनी घरातच थांबून लाॕकडाऊनचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले आहे. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वे कोव्हिड रूग्णालयास भेट देऊन डीआरएम कार्यालयात डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्याशी रेल्वेच्या डेटिकेटेड कोव्हिड रूग्णालयातील उपलब्ध सुविधांबाबत सविस्तर चर्चा केली.या बैठकीला प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, आमदार संजयभाऊ सावकारे, तहसीलदार दीपक धीवरे, मुख्याधिकारी करुणा डहाळे, डीवायएसपी गजानन राठोड,भुसावळ शहर व बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ,नगराध्यक्ष रमण भोळे आणि नगरपालिका दवाखान्याच्या डॉ.किर्ती फलटणकर आदींची या आढावा बैठकीला उपस्थिती होती.