चाळीसगाव – आज बोरखेडा पिराचे यागावी रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव च्या माध्यमातून नवीन आरसीसी स्थापन करण्यात आली. तसेच आषाढी एकादशी निमित्त गावातून “जागर भक्तीचा….जागर जनजागृतीचा….” या प्रकल्पांतर्गत प्रतिकात्मक दिंडी काढण्यात आली .लोक सहभागातून सामाजिक आरोग्य, ग्राम स्वच्छतेचे महत्त्व, वयक्तिक आरोग्य , शिक्षनाचे महत्त्व या विषयावर समुपदेशन करण्यात आले.
यावेळी हात धुवाचा उपक्रम घेण्यात आला।
यावेळी रोटरी चाळीसगाव चे अध्यक्ष डॉ. संदीप देशमुख, सचिव रोशन ताथेड, रोटे राजेंद्र कटारिया, रोटे नरेन्द्र शिरुडे तसेच समस्थ ग्रामस्थ , वारकरी संप्रदाय , व माताभगिनी उपस्थित होत्या. सामाजिक ऐक्याचे प्रतीक मुस्लिम बांधव देखील उपस्थित होते.