चांदवड, (प्रतिनिधी) – माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चांदवड येथे वार्ड क्र. 5 मध्ये आज रविवार दि.17 मे 2020 रोजी चांदवड भूषण कासलीवाल प्रथम नगराध्यक्ष यांच्या,व वार्डाचे नगरसेवक नवनाथ आहेर यांच्या उपस्थतीत कोरोना संसर्ग जन्य परिरिस्थतीचा विचार करून व नियम अटी विचारात घेऊन उदघाटन करण्यात आले.
माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्त्य ठेऊन यांनीच चांदवड शहरासाठी जो निधी उपलब्ध करून दिला त्या निधी अंतर्गत डांबरीकरण रस्त्याचे काम चालू करण्यात आले आहे.गिरीश महाजन यांना वाढदिवसानिमित्त हीच भेट आम्ही चांदवड कराणी दिली.सदर रस्ता हा गुरुकुल कॉलोनी येथे सुरू करण्यात येत असून या रस्त्यासाठी साधारणतः 66 लक्ष रुपये मंजूर असून 2 कि.मी.रस्ता पूर्ण होणार आहे.रस्त्याचे उत्कृष्ट काम करावे व अंदाज पत्रकानुसार व नियमानुसार सर्व गोष्टीची पूर्तता करावी असे वक्तव्य कासलीवाल यांनी नगरपरिषद अभियंता व संबंधित ठेकेदार याना सूचना केल्या या वेळी चांदवड नगरपरिषदेचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल,वार्डाचे नगरसेवक नवनाथ आहेर,निलेश काळे,निलेश गुजराथी,डॉ.जीवन देशमुख,नगरपरिषदेचे मुख्य अभियंता शेषराव चौधरी, सहायक अभियंता अनिल कुरे,उदय वायकोळे,किशोर सैद,सुनील जगताप,अशोक वायकोळे,पंकज राऊत,शक्ती ढोमशे, नितीन फंगाळ व आदी नागरिक उपस्थतीत होते.