विठुरायाच्या नामाच्या गजरात पिंप्राळा नगरी दुमदुमली
आषाढी एकादशीनिमित्त रथोत्सवाचे ठिकठिकाणी भाविकांकडून स्वागत
जळगाव – आषाढी एकादशी निमित्त शुक्रवारी पिंप्राळ्यात १४४ वर्षांची परंपरा लाभलेला पांडुरंगाचा रथाेत्सव साजरा करण्यात अाला. ‘अवतरला पंढरीचा पांडुरंग.. पिंप्राळा नगरीच्या संग.. पुंंडलीक वरदेव.. जयहरी विठ्ठला…’च्या गजराने पिंप्राळा नगरी दुमदुमली हाेती. विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची मांदियाळी पिंप्राळ्यात जमली हाेती. रथोत्सवानिमित्त पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात अाले. यात भाविक माेठ्याने संख्येने सहभागी झाले होते .
यावेळी जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, महापौर सीमाताई भोळे ,जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन ,उपमहापौर अश्विन सोनवणे ,नगरसेवक नीतीन लढा , विष्णू भंगाळे , कैलास सोनवणे, आदी उपस्थित होते.मंदिर संस्थानचे अध्यक्ष मोहन वाणी, उपाध्यक्ष पंढरीनाथ वाणी, अशोक वाणी, प्रमोद वाणी, संजय वाणी यांनी उपस्थित मान्यवरांसह रथोत्सव समिती, शांतता कमिटी सदस्य, मोगरी लावणारे स्वयंसेवक, भजनी मंडळांचा सत्कार केला.
यंदाच्या आषाढी एकादशीला रथोत्सवाला 144 वर्षे पूर्ण होतअसून जानकाबाई की जय’च्या जयघोषात भाविकांकडून मोठ्या भक्तीभावाने रथ ओढलागेला . यावेळी मान्यवरांच्या हस्ते रथाची आरती होऊन रथ मार्गस्थ झाला , . भजनी मंडळ मंदिरांमध्ये टाळ व मृदंगाच्या गजरात अभंग, गवळणी, भजन करून राधा कृष्णाच्या मुर्ती रथावर विराजमान करुन मंदिराचे पुजारी शामकांत जोशी यांच्या विधीवत पूजेनंतर वाणी समाजाच्या वतीने रथाची महापूजा व महाआरती करण्यात आली.यावेळी रथाच्या मार्गावर ठिकठिकाणी रथाचे स्वागत करण्यात आले.
रथोत्सव शांततेत पार पडावा कुठलाही गोंधळ होवून नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.