शिबीरात धुळयातील शिबीरार्थींचा सहभाग
धुळे – पुणे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने मेंढी व शेळी पालन व्यवसाय प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. या शिबीरातील शिबीरार्थींना अध्यक्ष बाळासाहेब दौडतले यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
शेतकर्यांसह युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध प्रशिक्षण देवून रोजगाराचा मार्ग दाखविला जातो. त्या अनुषंगाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्यावतीने प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. या शिबीरात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील अनेक प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला. त्यात धुळे जिल्हयातील प्रशिक्षणार्थींनी देखील सहभाग घेतला. शिबीराचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप बाळासाहेब दौडतले(राज्यमंत्री दर्जा) यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. शिबीरात धुळे जिल्हयातील रा.स.प.जिल्हाध्यक्ष जितेंद्रसिंग राजपूत, धुळे जिल्हा संघटक योगेश अहिरे, प्रशांत बेहेरे, नरेश पवार, प्रमोद पवार, सतिलाल कोळी, राजेंद्र सोनवणे, गणेश सेानवणे, नरेंद्र नेरे आदिंनी सहभाग घेतल