विजय रॅली चालली आठ तास ; कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण
चाळीसगाव : लोकसभा निवडणूकीत चाळीसगाव तालुक्याचे आमदार उन्मेष पाटील यांनी राज्यात सर्वाधिक 4 लाख 11 हजार 675 इतकी घवघवीत मते मिळवित खासदारकी जिंकली.राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना धुळ चारत पराभव केला. आमदार उन्मेष पाटील यांच्या खासदारकीच्या विजयानंतर प्रत्येक तालुक्यात कार्यकर्त्यांनी रॅली काढुन जल्लोष साजरा केला. तर सकाळी दहा वाजता येथील रेल्वे स्टेशन परिसरातुन विजयी रॅली काढण्यात आली.
ही रॅली रेल्वे स्टेशन मार्गे, सिग्नल चौक, सावरकर चौक, बाहाळ दरवाजा , सदर बाजार , सराफ बाजार, टाऊन हॉल मार्गे पाटणा देवी चौकातील अंहिल्यादेवी पुतळा ,
नागद चौफुली मार्गे, घाट रोड, कोळी महासंघाच्या कार्यालयावरून हॉटेल शिवनेरी जवळ समारोप करण्यात आला. यावेळी डीजे, बँड, ढोलताशा पथक व सांबळ पथक यांच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका ठरला होता. सजविलेल्या जीप मधून खासदार उन्मेष पाटील व त्यांच्या परिवारातील संपदा पाटील, कन्या सृष्टी चिरंजीव स्वामी, समर्थ , वडील भैय्यासाहेब पाटील नातेवाईक यांच्यासह नगराध्यक्षा आशालता चव्हाण,भाजप तालुकाध्यक्ष के बी साळुंखे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, पंचायत समितीच्या सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील आदी पदाधिकारी जनतेच्या आशीर्वादाचा स्वीकार करीत होते
चाळीसगाव तालुक्यात भरघोस लीड
चाळीसगाव तालुक्याचे आमदार उन्मेष भैय्यासाहेब पाटील तालुक्यातून भरघोस 67 हजारांचा लिड घेतला आहे. यामुळे भाजप, सेना, रिपाई व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण गावोगावी दिसुन येत आहे. काल सायंकाळी सात वाजता त्यांचा विजय घोषित झाल्यानंतर त्यांनी भाजपचे जिल्हा कार्यालय वसंत स्मृती येथे जाऊन कार्यकर्ते व पदाधिकार्यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेश दादा जैन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जळगावचे महापौर ना. सीमा भोळे, जिल्हा परिषदच्या अध्यक्षा उज्वला पाटील, पाचोर्याचे आमदार किशोर पाटील, अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी, आ. चंदुलाल पटेल, माजी आमदार गुरुमुख जगवानी यांच्यासह कार्यकर्त्यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी रावेर लोकसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित खासदार रक्षा खडसे देखील येथे आल्या त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. रात्री उशीरा चाळीसगावी घरी पोहोचले. दरम्यान, जैन एरीगेशन कंपनीच्या वतीने त्यांचा जैन हिल्स येथील कार्यालयात चेअरमन अशोक जैन यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी जैन कुटूंबिय यांच्या वतीने त्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधींची प्रतिकृती भेट देण्यात आली. सकाळी सातपासुन त्यांच्या घरी कार्यकर्त्यांची व विविध विभागातील पदाधिकार्यांची शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली होती. चाळीसगाव पोलीस उपविभागीय अधिकारी उत्तमराव कडलग यांच्यासह ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रतासिंह शिकारे, शहर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, सहाययक वाहतुक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांनी घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी जि. प. सदस्य प्रभाकर जाधव, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. विनोद कोतकर यांच्यासह अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
रॅली चालली आठ तास
सकाळी दहाला त्यांची उघड्या जिपमधुन भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत पत्नी संपदा पाटील, कन्या सृष्टी, मुलगा स्वामी व समर्थ यांच्यासह त्यांचे वडील भैय्यासाहेब पाटील हे देखील परिवारासह मिरवणूकीत सामील झाले होते. चाळीसगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उद्योजक मंगेश चव्हाण, रिपाई चे जिल्हाध्यक्ष आनंद खरात, पंचायत समिती सभापती शितल बोरसे, उपसभापती संजय भास्कर पाटील, सुभाष पाटील, पं. स. सदस्य साहेबराव, जि. प. सदस्या मंगलबाई जाधव, शिवसेनेच्या नगरसेविका विजया पवार, विजया भिकन पवार, भाजप तालुकाध्यक्ष के. बी. साळुंखे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील,बापु अहिरे, सोमसिंग राजपूत, चंदु तायडे, बबन पवार, चिराग शेख, मानसिंग राजपूत, गटनेते संजय पाटील,नगरसेवक नितीन पाटील प्रशांत वाघ,,जितु वाघ, शेषराव चव्हाण, विजय पांगारे, महेश सोनार, अमोल चव्हाण, गौरव पुरकर, अमित सुराणा, फय्याज शेख ,भाजप तालुका विस्तारक गिरीष बर्हाटे, आत्मा कमिटी अध्यक्ष रवींद्र चौधरी, युवा मोर्चाचे अक्षय मराठे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.जळगाव लोकसभा मतदारसंघात 4 लाख 11 हजार 675 मतांनी घवघवीत यश संपादन करणारे तरूण खासदार उन्मेष पाटील यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून अभिनंदन केले. पक्षाने दिलेली जबाबदारी कमी वेळेत आपण पेलली असुन राज्यात सर्वाधिक मतांनी आपण मिळविलेला विजय हा पक्षासाठी अभीमानास्पद आहे. त्याबद्दल उमेश पाटील यांचे अभिनंदन केले आहे. राज्यात उन्मेष पाटील यांनी विक्रमी यश संपादन केल्यामुळे सोशल मीडियावर त्यांचे जोरदार अभिनंदन करण्यात येत होते.