जळगाव,(प्रतिनिधी)- नंदुरबार येथील सौ. इंदिरा राजपूत यांचा कोरोना संशोधन प्रबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाल्याने खान्देश वासियांची मान उंचावली असल्याने करणी सेना जळगाव जिल्ह्याच्या वतीने अभिनंदनाचा ठराव केला असल्याचे जिल्हा प्रमुख प्रविणसिंग पाटील यांनी प्रसिद्ध पत्रकान्वय कळावीले आहे.
खानदेश कन्या सौ. इंदिरा जितेंद्रसिंग राजपूत यांनी कोविड- 19 या विषयावर शोध निबंध सादर केला असून भारतात मान्यता प्राप्त औषधानीच कोरोना आटोक्यात येऊ शकतो असा दावा देखील करण्यात आला आहे. सौ. इंदिरा राजपूत यांनी आपला शोध निबंध इंटरनेशनल इंटरडिसिप्लिनरी रिसर्च जर्नल कडे पाठविला होता. सदर शोध प्रबंध दि. 12 मे रोजी प्रसिद्ध झालेला आहे. या अभ्यासपूर्ण शोधप्रबंधाने खान्देश वासियांची मान उंचावली असून त्यांचा जळगाव जिल्हा करणी सेनेच्या वतीने अभिनंदन करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रमुख प्रविणसिंग पाटील यांनी कळविले आहे.