चांदवड,नाशिक – घर पट्टी, पाणी पट्टी करात नागरिकांना पन्नास टक्के सूट द्यावी अशा मागणीचे नी निवेदन आज चांदवड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुख्याधिकारी नगरपरिषद चांदवड यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शहरात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यावसायिक दुकाने बंद आहेत.शहरात छोटे मोठे व्यावसायिक,मजूर या वर्गातील लोक राहतात,सध्याची परिस्थिती अजूनही काही महिने राहिली तर लोकांचे उत्पन्न शून्य राहील,याचा विचार करून घरपट्टी,नळपट्टी व इतर करांमध्ये 50 %सूट मिळावी अशी मागणी एक निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर तालुका अध्यक्ष प्रकाश शिंदे, सरचिटणीस हरी ठाकरे, रवींद्र बागुल, भरत क्षेत्रीय यांच्या स्वाक्षरी आहे.