चाळीसगांव ग्रा.ता.प्रतिनिधी (विकि पानकर ):-तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार मंगेशदादा चव्हाण व भारतीय जनता पक्षाच्या वतीने मागील ४८ दिवसांपासून तालुक्यातील व चाळीसगांव शहरातील गोर – गरीब व गरीब जनतेचे आमदार मंगेशदादा चव्हाण व पक्षा तर्फे २००० गरजूंना अन्नसेवा न थकता व न चूकता देण्याचे कार्य आजपर्यंत सुरू ठेवले आहे. त्यात आज आमदार चव्हाण यांचे सहकारी मित्र व चाळीसगांव शहरातील प्रभाग क्रमांक
मधील नगरसेवक भास्कर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब जनतेला पायनापल शिरा व पनीर सोयाबीन पुलावाचे भोजन दिले . त्याप्रसंगी आमदार मंगेशदादा चव्हाण , नगरसेवक भास्कर पाटील , योगेशभाऊ खंडेलवाल , मनोज दादा गोसावी यांच्या सह तालुक्यातील भाजपा चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्याभरातून सर्वांचे कौतुक केले जात आहे.
तालुक्यातील गोरगरीब जनते सोबत मी व माझा पक्ष खंबीरपणे उभे आहोत कोरोना विषानुवर मात करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे अशे आव्हान आमदार चव्हाण यांनी जनतेला केले आहे.