मोबाइलसह साहित्य लंपास ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव – शहरातील अयोध्यानगरातील लिलापार्कमधील बंद घर फोडून मोबाइलसह इतर साहित्य लंपास करण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुध्द् गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनंता भानुदास झोपे व तुषार विलास झोपे (दोघे रा. सालबर्डी, ता. मुक्ताईनगर) हे दोघेही शहरातील रेमंड कंपनीत कामास असून अयोध्यानगरातील लिलापार्क येथे भाड्याने खोली घेऊन राहतात. बुधवारी रात्रपाळीची ड्युटी असल्याने दोघेही रात्री ११ वाजता रूम बंद करून कामावर गेले होते. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास दोघेही घरी परतल्यानंतर त्यांना दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसून आले. घरात प्रवेश केल्यानंतर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकलेले आढळून आले. चोरटयांनी दोन मोबाईल, ब्लूटूथ, पेन ड्राईव्ह, कुकर, नवीन ड्रेस असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्याविरद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहा. फौजदार अतुल वंजारी करीत आहेत.