पाचोरा, (प्रतिनिधी)- शहरातील संभाजी नगर भागात नागरिकांनी पाणी भरण्यासाठी गर्दी केल्याने तसेच काहींनी तर माक्स न लावताच फिरकल्याने लॉकडाऊन फज्जा उडविला.
शहरातील सुपडुभादू विद्या मंदिर मागील बाजूस गौंड बस्ती मधील नागरिकांकडे पाण्याचा पुरेसा साठा नसल्याने संभाजी नगर भागातील नगर परिषदेच्या पाणीपुरवठा टाकीवर पाणी भरण्यासाठी आज गर्दी केली. कुठलेही सोशल डिस्टन्स न ठेवता मोठया प्रमाणात गर्दी केली होती. याच भागात काही अंतरावर स्टेट बँकेच्या परिसरात कोरोना बाधित रुग्ण दगावला असुन या परिसरातील नागरिकांना याचे कुठलेही गांभीर्य दिसुन आले नाही.