जळगाव, (प्रतिनिधी) – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकातर्फे करण्यात आलेल्या तपासणीत त्रुटी आढळल्यामुळे तसेच विभागीय नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत चाळीसगाी येथील क्रिश वाईन्सचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी घेतला.
चाळीसगाव येथील क्रिश वाईन्सची २५ एप्रिल रोजी तपासणी करण्यात आली होती. यातील साठ्यात चुकीच्या नोंदी आढळून आल्या होत्या, शेरे पुस्तिका सदर न करणे, नोकर करारनामा सादर न करणे, एफएलआर-3 नोंद वही दिनांक 20 मार्च अखेरपर्यंतच लिहलेली नाही, एकूण एक दिवसाची नोंद घेतलेली नाही, सीएल -22 नोंद वही दिनांक 20 मार्च अखेरपर्यंतच लिहलेली नाही, एकूण एक दिवसाची नोंद घेतलेली नाही, विदेशी मद्य ब्रँड वाईज नोंद वही दिनांक 20 मार्च अखेरपर्यंतच लिहलेली नाही, एकूण एक दिवसाची नोंद घेतलेली नाही.यासह अनेक त्रुटी आढळून आल्याने विभागीय नियमभंग झाल्याने य आज जिल्हाधिकार्यांनी क्रिश वाईन्सचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.