Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोनाचा वाढता संसर्ग,लॉकडाऊन आणि राज्यातील परिस्थीवर काय म्हटले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहा

najarkaid live by najarkaid live
May 8, 2020
in आरोग्य, राज्य
0
पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन भडकवू नये – मुख्यमंत्री
ADVERTISEMENT
Spread the love

  • मुंबईत प्रत्येक नागरिक हाच जवान; लष्कराची गरज नाही

  • लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केल्यास यातून लवकर सुटका होईल

मुंबई दिनांक ८:  महाराष्ट्र हा शिवरायांचा लढवय्या महाराष्ट असून मुंबईत लष्कराची गरज नाही. येथील प्रत्येक नागरिक हाच जवान आहे. त्यामुळे मुंबईत लष्कर आणणार किंवा, लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तुंची सर्व दुकाने बंद होणार या अफवा असून लोकांनी यावर विश्वास ठेऊ नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले तसेच ते पुढे म्हणाले की, लोकडाऊन संपवणे आपल्या हातात आहे. आपण जेवढी शिस्त पाळु, संयम ठेऊन वागू तेवढी आपल्याला कोरोनाची साखळी तोडणे शक्य होणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी आतापर्यंत केले तसेच सहकार्य यापुढे ही करावे, शिस्त पाळावी आणि कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करावी.

 आज मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमातील थेट प्रक्षेपणाद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते.
अस्वस्थ होऊ नका मुख्यमंत्र्यांचे आवाहन
औरंगाबाद-जालना रेल्वे मार्गावर झालेल्या अपघाताने व्यथीत झाल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यातील मजुर-कामगार आणि लोकांना महाराष्ट्र शासन खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा, तुमच्या राज्याबरोबर, केंद्र सरकारबरोबर बोलणी सुरु असून तुम्हाला तुमच्या घरी,तुमच्या राज्यात सुखरूप पाठविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, रेल्वे, बसची व्यवस्था करण्यात येत आहे त्यामुळे संयम  सोडू नका, अस्वस्थ होऊ नका,गर्दी करू नका आणि अफवेला बळी पडू नका असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आरोग्य सुविधेत वाढ
कोरोनाचे संकट मोठे होत आहे तशा आपण आरोग्य सुविधाही वाढवत आहोत, रेसकोर्स मैदान, वांद्रा-कुर्ला संकुल, गोरेगावचे एक्झिबिशन सेंटर येथे आपण रुग्णांच्या विलगीकरणाची, उपचाराची व्यवस्था करत आहोत.  हे करतांना तोंडावर येऊन पोहोचलेल्या पावसाचा ही विचार करावा लागत आहे. ऐनवेळी धावपळ होऊ नये यासाठी  रेल्वे, बीपीटी आणि लष्कराची रुग्णालये वापरण्याची परवानगी आपण केंद्र शासनाकडे मागितली आहे. त्यास केंद्राने मान्यता ही दिली आहे. सध्या सगळी यंत्रणा तणावाखाली आहे. पोलीस, डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार हे आपल्यासाठी लढत आहेत, आजारी पडत आहेत, दुर्देवाने काही पोलीसांचे मृत्यू देखील झाले आहेत. ते आजारी पडल्यानंतर त्यांना बाजूला करणे चुकीचे आहे, त्यांना थोड्या काळासाठी विश्रांती मिळावी म्हणून, पोलीसांना आलेला थकवा जावा म्हणून केंद्र सरकारकडे अतिरिक्त मनुष्यबळ देण्याची विनंती आपण करत आहोत.
*हॉस्पिटलमध्ये गलथानपणा चालणार नाही*
हॉस्पीटलधील गलथानपणा अजिबात सहन केला जाणार नाही असा इशारा देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, पोलीस, डॉक्टर हे आपल्यासाठी देव आहेत, त्यांच्यावर हल्ला करू नका, कडक कारवाई होईल. पण हे करतांना डॉक्टरांनीही गलथानपणे काम करू नये, कारवाईची वेळ आणू नये. टास्कफोर्स, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, आपल्यासोबत आहेत,  ही लढाई आपण एकमेकांच्या सहकार्याने सक्षमपणे लढत आहोत. तरी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आयुष, होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक डॉक्टरांनी पुढे येऊन  सर्वसामान्य रुग्णांना सेवा देण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये राज्याची विभागणी केली आहे रेड झोनमधील नियम अधिक कडक करतांना इतरत्र काही अटी आणि शर्थीच्या अधीन राहून आपण व्यवहार सुरु केले आहेत. लॉकडाऊन हे गतिरोधक आहे, त्यामुळे गती कमी झाली परंतू साखळी तोडण्यात अजून यश आले नाही. अजून काही ठिकाणी लोक शिस्त पाळताना दिसत नाहीत, तसे होऊ नये, आपल्याला कोरोनाची साखळी तोडायची आहे. आपण सर्व मिळून एकदाच कडक बंधने पाळू आणि ही साखळी तोडू असेही मुख्यमंत्री म्हणाले.
2 लाख चाचण्या
परदेशातून येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन केले जाणार आहे अशी माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, दोन लाखाच्या आसपास राज्यात कोरोना चाचण्या  झाल्या आहेत. काही जण अगदी शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात दाखल होत आहेत त्यामुळे इच्छा असूनही त्यांना वाचवता येत नाही. जर सर्दी, पडसे आणि खोकला असेल तर न घाबरता फिव्हर रुग्णालयात स्वत: येऊन तपासणी करून घ्या असे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केले.
सव्वा तीन हजार रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात कोरोनाच्या १८ हजार केसेस पैकी सव्वातीन हजार लोक बरे होऊन घरी गेले आहेत. ही संख्या वाढते आहे काही गर्भवती महिला  ज्या कोरोना पॉझेटिव्ह आहेत त्या प्रसुत झाल्यानंतर बाळाला कोरोनाची लागण नाही हा चमत्कारही दिसून येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आमदार झाले पालक तर प्रांताधिकारी व तहसिलदार यांनी पकडला आंतरपाट

Next Post

पाचोरा येथे आणखी एक कोरोना बाधित रूग्ण आढळला

Related Posts

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

June 30, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

June 30, 2025
Next Post
कोरोना उपचारावर प्लाझ्मा थेरपी उपचार काय आहे जाणून घ्या

पाचोरा येथे आणखी एक कोरोना बाधित रूग्ण आढळला

ताज्या बातम्या

Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us