जळगाव, (प्रतिनिधी)- जिल्ह्यात 114 रुग्ण कोरोना बाधित झाले असून दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत चालली आहे.त्यातच आता जिल्ह्यातील एक वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट कालच आल्याचे वृत्त समोर आले आहे.याबाबत प्रशासनाने दुजोरा दिला आहे.
नागरिकांना कोरोना प्रादुर्भाव पासून संरक्षण करतांना, वेळो वेळी नागरिकांना सूचना देतांना या कोरोना योध्यांना काम करावे लागत आहे. कोरोनामुळे झालेल्या प्रतिबंधित क्षेत्रात सुद्धा यांना काम करावे लागत आहे.या मुळेच पोलीस खात्याचा एक वरिष्ठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आता तरी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना पालन करून कोरोना विरुद्ध लढण्यास प्रशासनाला सहकार्य करावे.
या सर्व परिस्थितीत प्रशासन जीव पणाला लावून काम करत आहे. तरी नागरिक अजूनही गंभीर झालेले दिसत नाहीत. वेळो वेळी प्रशासनाने सूचना देऊनही नागरिक काम नसतांना घराबाहेर पडतांना दिसत आहे.अजूनही वेळ गेली नसून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पणे पालन करून आपण जिल्ह्याला कोरोना मुक्त करू शकतो तरी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन दैनिक नजरकैद च्या वतीने करण्यात येत आहे.