चाळीसगांव (विकि पानकर):-कोरोना सारख्या महामारी संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यसरकार सोबत जिल्हा प्रशासन ही सर्वतोपरी मदत व सहकार्य करीत असून त्याचाच एक भाग म्हणून चाळीसगांव चे आमदार मंगेश चव्हाण यांच्या मातोश्री व सौभाग्यवती यांनी आमदारांचे जनसेवा कार्यालयातच सुरू केले साहाय्यता कक्ष
सविस्तर असे कि, आज पोवोतो निवडणुकीच्या वेळी मत मागण्यासाठी अनेक पुढाऱ्यांच्या सौभाग्यवती व कुटुंब घरोघरी फिरताना आपण पाहिले असेल
पण कोणतीही निवडणूक नसताना तसेच कोरोनाच्या भीतीने भलेभले पुढारी घराबाहेर निघत नसताना आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी व शिवनेरी फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण या मात्र लॉकडाऊन मुळे इतर जिल्ह्यात व राज्यात अडकलेले नागरिक यांना मदत करण्यासाठी स्वतः कार्यालयात हजर आहेत,
येणारे अर्जदार यांच्या समस्या जाणून घेत त्यांना धीर देत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या जनसेवा कार्यालयात साहाय्यता कक्ष सुरू केला असून येणाऱ्या प्रत्येकाला मार्गदर्शन व मदत सौ.प्रतिभाताई चव्हाण करत आहेत.
जनतेने दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवत जनतेच्या सेवेसाठी पूर्णवेळ उपलब्ध असणारे आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभाताई चव्हाण यांच्या कार्यामुळे चाळीसगांव तालुक्यात त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.