भुसावळ, प्रतिनिधी – इंडियन यूनियन मुस्लीम लीग यांच्या मार्फत भुसावळ तहसीलदार यांना डॉ. इमरान रउफ खान’ अब्दुल रउफ शेख’ यांनी व सहकाऱ्यां मार्फत निवेदन देण्यात आले.
सद्या संपूर्ण देशात कोरोना संसर्गचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व भुसावळ शहर मध्ये कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आणखी वाढु नये आणि लवकर आपले भुसावळ कोरोना मुक्त व्हावे यांसाठी रमज़ान मध्ये सुध्दा भुसावळ बाजार बंद ठेवण्यात यावे या मागणीचे निवेदन इंडियन यूनियन मुस्लिम लीग मार्फत देण्यात आले . या प्रशासनास निवेदन आहे की रमज़ान मध्ये बाजार बंद ठेवावे आम्हाला कुठलीही खरेदी करायची नसल्याचे निवेदनात म्हटले आहे .