जळगांव:- जळगाव जिल्हा पोलिस दलात पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोलीस विनोद पितांबर अहिरे यांना एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन तर्फे सदरचा पुरस्कार जाहीर करण्यात आला श्री. आहिरे यांनी कोरोना महामारी रोखण्यासाठी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीत दिलेच पण त्याचबरोबर प्रत्यक्ष कोरोना कक्षात ड्युटी स्वीकारून त्यांनी आपल्या शौर्याचे आणि देशभक्तीचे दर्शन समाजाला घडविले आहे.
तसेच प्रत्यक्ष “कोरोना कक्षात” ड्युटी करताना काय भावना असतात. त्या “कोरोना कक्षाच्या गार्ड ड्युटी निमित्त” व “मृत्यू घराचा पहारा करताना” या शीर्षकाखाली आपले अनुभव शब्दबद्ध करून त्यांनी लेख लिहून समाजामध्ये प्रबोधन घडवले आहे. विनोद अहिरे यांचे दोघे भाऊ राहुल पितांबर अहिरे (तलाठी) हे देखील जळगाव येथे कोरोणाच्या पार्श्वभूमीवर काम करीत आहेत. तसेच त्यांचा लहान भाऊ छोटू पितांबर अहिरे सीबीआय नागपूर येथे ते देखील कोरणाच्या पार्श्वभूमीवर ड्युटी सांभाळत आहेत. त्याच प्रमाणे त्यांचा शालक बजरंग सपकाळे हे मुंबई एस आर पी एफ येथे रेड झोन मध्ये काम करीत आहेत. असे त्यांचे सारे कुटुंब कोरणा महामारी रोखण्यासाठी हातभार लावीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सलाम कलाम डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन’च्या मनिषा ताई चौधरी यांनी फोन करून त्यांचे आभार मानले आणि त्यांच्या कार्याचे कौतुक करून डिजिटल आभार पत्र देखील दिले.
कोरोचा प्रादुर्भाव संपल्यावर त्यांना नाशिक येथे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या परिवारातील सदस्यांकडून सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या या कार्याबद्दल पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके व पोलिस उपअधीक्षक गृह तसेच महानगर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, रिपाइं जिल्हाप्रमुख मिलींद तायडे.सह जिल्हाभरातील सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी श्री.आहिरेंचे अभिनंदन केले आहे.