चाळीसगाव, (प्रतिनिधी)- येथे रोटरी परिवाराकडून प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या उपस्थितीत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ देवराम लांडे , व चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय येथील प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ बी. पी. बाविस्कर यांना PPE किट सुरक्षेच्या दृष्टीने प्रदान करण्यात आले.
आज कोरोनाशी दोन हात करतांना ह्या किट ची नितांत आवश्यकता व महत्त्व खूप आहे, व रोटरी परिवाराने केलेल्या ह्या सहकार्याबद्दल डॉ बी पी बाविस्कर यांनी विशेष आभार मानले, रोटरी येथे डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल रोटे राजेंद्र भामरे यांनी हे किट उपलब्ध करून दिले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव चे अध्यक्ष डॉ संदीप देशमुख, रोटरी मिल्कसिटी चे अध्यक्ष रोटे दिनेश ठक्कर, रोटरी संगम चे अध्यक्ष रोटे प्रशांत शिनकर, रोटरी मिलिनीअम चे अध्यक्ष संदीप जैन तसेच रोटे राजेंद्र कटारिया, रोटे बाळासाहेब चव्हाण, रोटे सुधीर पाटील, रोटे गणेश बागड, प्रियेश कटारिया, सुनील गोपलानी, रोटे उमाकांत ठाकूर आदी उपस्थित होते.