बोदवड, (प्रतिनिधी)- तालुक्यात एपीएल कार्ड धारकांना रेशनचे धान्य मिळत नाही अशी तक्रार तालुका रेशन वितरण कमेटी करताच तहसिलदार श्री. जोगी यांनी अनेक गावांना आज भेट घेऊन तपासणी केली.
बोदवड तालुक्यातील काही गावांमध्ये अजुनही APL कार्डधारकांचे धान्य वाटप झालेले नाही तरी APL रेशनकार्ड धारकांना त्वरीत धान्य वाटप करावे याबाबत तहसीलदारांना निवेदन तालुका रेशन वितरण कमिटीने दिले होते.त्यानुसार तहसीलदार यांनी तात्काळ पाहणी केली.
तसेच बोदवड तालुका कमेटीतर्फे धान्य गोडाऊन वर गोडाऊन कीपर यांच्याशी चर्चा करुन धान्याचे वजन माप यंत्राची पाहणी करण्यात आली यावेळी भारत पाटील (अध्यक्ष), आधारसिंग पाटील ( सचिव )अजय गवळे, पुजांजी पाटील, मुजफ्फर मिया मुक्तार मिया, सुभाष देवकर, सुभाष पालवे, सचिन पाटील हे उपस्थित होते.