जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही
मुंबई /जळगाव ;- शिक्षक राज्य विकासाचा महत्त्वाचा घटक असल्याने राज्यातील शिक्षकांची व त्यासंदर्भात कार्य करणाऱ्या सर्व शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष यांनी वाडी वस्ती तांडा व गाव पातळीवर दुर्गम भागात कार्य करणाऱ्या शिक्षकांचे आणलेल्या सर्व आलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यासंदर्भात सातत्याने सकारात्मक भूमिका राज्य शासन घेत असून यापुढेही घेईल अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांनी राज्यातील 38 शिक्षक संघटनांच्या राज्य अध्यक्षांच्या राज्य समन्वय समिती पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित राज्यस्तरीय बैठकीत बोलताना दिली .
मंत्रालयात मुंबई येथे 9 रोजी दुपारी मंत्रालयात राज्य समन्वय समितीची वतीने राज्यातील शिक्षक केंद्रप्रमुख पदवीधर शिक्षक राज्य शासन आदर्श शिक्षक अभावित केंद्रप्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी यांचे 24 प्रश्नांवर राज्याचे शालेय शिक्षण मंत्रीआशिष शेलार यांच्यासोबत मीटिंग ठेवली होती. परंतु साहेब परदेशात गेले असल्यामुळे स्वतः गिरीश महाजन यांनी सर्व प्रश्न त्यांच्या मंत्रालयातील दालनात समजून घेऊन लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन राज्य समन्वय समितीला दिले . आशिष शेलार यांची दूरध्वनीवर संपर्क साधून राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुं झ र कर यांना लवकरच शिक्षण शिक्षक विभागातील राज्यस्तरीय प्रश्नांसंदर्भात अधिकृत मीटिंग बोलवण्यात संदर्भात कळवू असे ठोस आश्वासन दिले . तसेच निवेदन वरील राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना राज्यातील दलित मित्र व इतर पुरस्कार प्राप्त प्रमाणे कुटुंबीयांसह राज्यात एसटी प्रवास सवलत मोफत करता यावा यासाठी राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष किशोर पाटील कुं झ र कर यांच्या वतीने करण्यात आलेली मागणी आदेश काढण्यात येतील असे आश्वासन पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांनी राज्यभरातून आलेल्या शिष्टमंडळाला दि ले .शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष ईला हजू उद्दीन फारु की महाराष्ट्र राज्य समन्वय समितीचे सचिव बाबुराव पवार महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अरुण जाधव आच्चीत साबळे परमेश्वर सावळे पांडुरंग काकतकर पुष्पलता मुळे जतीन कदम पालघर महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष एम ए गफ्फार नांदेड समाजसेवक किशोर पाटील ढोमणे चाळीसगाव मुंबई महिला पदवीधर संघाच्या कार्याध्यक्ष मीना पगारे राम सुतार ओमप्रकाश थेटे यांच्या सह राज्य समन्वय समितीमध्ये सहभागी 38 शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष यांचा समावेश होता.