पाचोरा, (प्रतिनिधी)- येथील एस एस पाटील गृपच्या वतीने सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांना आपले स्व:तहाच्या मालकीचे “स्वप्नशिल्प रेसीडेन्सी” विनामूल्य उपलब्ध करून दिल्याने या कोरोना योध्यांसाठी ही व्यवस्था दिलासा देणारी ठरत आहे.
कोरोना रुग्णांसाठी सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांना घरी न जाता सर्व डॉक्टर आपला निवास भडगावरोडवरील माजी नगरसेवक प्रदिप (बापु) शांताराम पाटील यांच्या “स्वप्नशिल्प रेसिडेन्सी” येथेच वास्तव करित आहेत सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.