जळगाव, (प्रतिनिधी)- जळगाव चे अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांच्या पदोन्नती झाल्याने रिक्त होणा-या जागेवर नाशिक येथील प्रविण महाजन यांची जळगाच्या नुतन अपर जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली आहे.
शासनाने अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश दि. 30 रोजी काढले असून जळगाव अपर जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे यांची पदोन्नती झाल्याने त्यांच्या जागी नाशिक येथून प्रविण महाजन तर जळगाव चे निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांची उपायुक्त पुरवठा म्हणून औरंगाबाद येथे पदोन्नतिवर नियुक्तीचे आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे.