- चाळीसगांव राहणार तीन दिवस कडकडीत बंद
- कोविड-१९ समितीचा एकमूखी निर्णय
- उल्लंघण केल्यास कारवाई
चाळीसगांव,(ग्रामीण वार्ताहर विकी पानकर ):-
सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने सारा देश हादरला असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे . याला आळा घालण्यासाठी व संसर्ग वाढू नये म्हणून चाळीसगांव कोविड १९ समितीने १ मे ते ३ मे असे तीन दिवस संपूर्ण कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय एकमुखाने घेतला आहे.
चाळीसगांव तालुक्याला जळगांव , अमळनेर , पाचोरा या कोरोना बाधित तालुक्यांचा तसेच औरंगाबाद या जिल्ह्यांचा विळखा आहे .
चाळीसगांव गांव चौफुलीवरील गांव असून सर्वत्र दळणवळणाच्या सर्व सुविधा बंद असताना सुद्धा परगावाहून अनेक जन मोटारसायकलने तसेच पायी व अन्य मार्गाने येतच आहेत . त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून संपूर्ण चाळीसगांव तीन दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला .
दि .१ ते ३मे असे तीन दिवस गांव बंद राहणार असून विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे .यासाठी प्रशासनाने सहकार्य राहणार आहे. यावेळी कोविड१९ नियंत्रण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते .