रावेर – करोना मुळे असलेल्या लॉक डाऊन काळात असाही एक आदर्श विवाह सोहळा पाच लोकांच्या उपस्थित आज 29 रोजी पार पडला.
रावेर येथील श्री रवींद्र तुकाराम महाजन सर याची कन्या स्नेहा व केऱ्हाडा येथील मोहन राजाराम पाटील यांचे चिरंजीव वैभव यांचा विवाह सोहळा घराच्या हॉल मध्ये चार लोक व एक ब्राह्मण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. वधू स्नेहा ही डॉ प्रविण चौधरी व डॉ चैताली चौधरी (समृद्धी हॉस्पिटल रावेर )यांची भाची आहे.
या आदर्श विवाहा प्रसंगी डॉ प्रविण चौधरी व चैताली चौधरी यांचे कडून वधू वरास आशीर्वाद म्हणून काही सोन्याचा वस्तू व काही गरीब व गरजू कुटुंबाना प्रत्येकी 500रु ची मदत देण्यात आली. वधू वर यांना नातेवाईक मंडळींनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या.
यावेळी सोशल डिस्टन्स चे संपूर्ण पालन करीत विवाह सोहळा पार पडला. समाजात असाही एक आदर्श सोहळयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.