पर्यटकांची तोबा गर्दी
यावल- तालुक्यातील सातपुडा निवासनी श्रीक्षेत्र मनुदेवी या तिर्थक्षेत्रावरील मनमोहक धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा धबधबा ओसंडून वाहत असतो. मात्र, सोमवार आणि रविवारी सातपुड्यात दमदार पाऊस झाल्याने धबधबा ओसांडू लागला आहे. सातपुड्याच्या निर्सगरम्य वातावरणातील श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिरालगतचा सुमारे ४०० फूट उंची वरून कोसळणारा धबधबा दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ओसांडून वाहतो . जुलै महिन्यातचं धबधब्याच्या पाणलोटक्षेत्रात दमदार पाऊस झाला व परिणामी सोमवारपासून हा धबधबा ओसांडून वाहू लागला आहे. यामूळे यंदा चांगला पाऊस राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणावर पर्यटक याठिकाणी भेट देण्याची शक्यता आहे.