मुक्ताईनगर, (प्रतिनिधी) – येथे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर शहरात दोन ठिकाणी कोवीड19 केअर सेंटर उभारण्यात येणार असून कर्तव्य म्हणून आमदार चंद्रकांत पाटील यांनी येथे क्वॉरंटाईन म्हणून ठेवण्यात येणाऱ्या रुग्णाच्या जेवणाची व्यवस्था करणार असल्याचे पूर्वीच जाहीर केले आहे .त्यासह त्यांनी दि 29 एप्रिल रोजी 100 बेडशीट व 100 उशी (पिलो) तहसिलदार शाम वाडकर यांच्या ताब्यात देण्यात आले .
प्रसंगी नायब तहसीलदार प्रदीप झांबरे , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश पाटील , उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ योगेश राणे , आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी , दीपक पवार , राजेंद्र कापसे , शुभम शर्मा यांची उपस्थिती होते.
कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर लागु करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे कोरोनाचा संशयीत रुग्ण आढळल्यास त्याला आयसोलेशन विभागात ठेवण्याची व्यवस्था व्हावी म्हणुन शहरातील पंचायत समिती जवळील आदिवासी विभागाचे आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह येथे ४० खाटांचे कोवीड केअर सेंटर तसेच शहरातील संत मुक्ताबाई महाविद्यालयाजवळील समाजकल्याण विभागाचे मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह येथे ४० खाटांचे कोवीड केअर सेंटर सुरू होणार आहे.