जळगाव (प्रतिनिधी)- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संपूर्ण राज्यात लाॉकडाऊन असल्याने दिनांक 29/03/2020 रोजी निश्चित लग्न विधी सोहळा तो विधी सोहळा रद्द करण्यात आला होता.मात्र लॉकडाऊन वाढतच असल्याने शाररिक आंतर राखत आज दि. 28 रोजी विवाह सोहळा पार पडला.
यावेळी सामाजिक सोलोखा राखत कोणत्याही प्रकारचा गाजा वाजा व धार्मिक परंपरा ना थारा न देता शाररिक आंतर ठेवत लग्न विधी सोहळा संपन्न झाला.
दिलीप सांडू सपकाळे यांची भाची उपासिका अर्चना अरुण सोनवणे रा नागसेन नगर जळगाव संग उपासक विजय शेनफडू खरे यांचे चिरंजीव रा. कासमपुरा ता. पाचोरा यांचा लग्न सोहळा वधू वरांच्या आई वडिलां सह धम्मदुत तायडे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले.
यावेळी संविधान जागर समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.