भुसावळ, (प्रतीनीधी) शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील एक व्यक्ती कोरोना बाधित आढळल्याने सिंधी कॉलोनी ‘ देना नगर ‘ आनंद नगर ‘अष्टभुजा देवी मंदिर ‘ प्रोफेसर कॉलोनी ‘ नाहटा कॉलेज सुमारे एक किलोमीटरचा परिसर मध्य रात्री पासून १४ दिवसांसाठी सील करण्यात आला आहे .
यापूर्वी समता नगरातील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांनी तातडीची आपत्कालीन बैठक घेऊन परिसर सील केला आहे.
भुसावळ कॉरोना पॉझिटिव्ह संख्या आता दोन झाली असुन नागरिकांनी घाबरून न जाता घरातच थांबावे व विनाकारण कोणीही घराच्या बाहेर न पडण्याचे अवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.