जळगाव, (प्रतिनिधी)- शहरातील हुडको येथे दोन गटात तुफान हाणामारी झाल्याने दंगल घडल्याची घटना नुकतीच घडली असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आता दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे कळते.
आज हुडको येथे बुद्ध विहारा जवळ काही तरुण नेहमी प्रमाणे बसले असतांना किरकोळ कारणावरून भांडण झाले. किरकोळ भांडणाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत होऊन चार पाचशे लोक रस्त्यावर आल्याने घटनेला दंगलीचे स्वरूप आले होते व दगडफेक देखील यावेळी जमावाने केले असल्याचे समजते. पोलीस वेळेत पोहचल्याने परिस्थिती नियंत्रणात असून हुडकोत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.